जगाच्या इतिहासात काही घटना अशा असतात ज्या केवळ काळाला नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या विचारांना दिशा देतात. त्यापैकीच सर्वात भयानक आणि परिणामकारक घटना म्हणजे द्वितीय महायुद्ध १९३९ ते १९४५ दरम्यान सहा वर्षं चाललेलं असं युद्ध, ज्यात ३० पेक्षा जास्त देश सहभागी झाले आणि सुमारे ७ कोटी लोकांनी आपले प्राण गमावले. हे केवळ लष्करी संघर्ष नव्हतं; ते विचारसरणींचं, साम्राज्यांच्या महत्त्वाकांक्षांचं आणि मानवी अस्तित्वाच्या मर्यादांचं युद्ध होतं.या सर्वाचं मूळ होते जर्मनीतील नाझी राजवट. पहिल्या महायुद्धानंतर व्हर्साय तहामुळे जर्मनी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला होता. या परिस्थितीत एक करिष्माई पण निर्दयी नेता अॅडॉल्फ हिटलर पुढे आला. त्याने जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली बनवण्याचं स्वप्न दाखवलं आणि