विडंबन

  • 600
  • 174

माणसाच्या भावना कित्ती वेगवेगळ्या आणि कित्ती प्रकारे बदलत असतात.प्रत्येक माणसाचे आचार विचार वेगळे ! खरचं!! नवलचं वाटतं विचार करून कसा निर्मिला असेल सृष्टिकर्त्याने हा देह की प्रत्येक माणसाचे केवळ शरीरचं नाही तर मनही वेगळे विचारांसोबत मनही वेगळेच!!!            कोणताच व्यक्ती कायम आनंदी राहू शकत नाही. तो कुठल्या न कुठल्या दुःखात गुरफटलेला असतो.काहींचे दुःख खूप जास्त काहींचे खूप कमी असा समज मनात येतो. आपलं दुःख म्हणजे जगविपरित हा समज. देवाने सर्वांगी कुशल बनवून पाठवलयं हे पुरेसं नसतं.कधी हा विचार केलाय का? कसे जगत असतील ती लोकं ज्यांना हात नाहीत,पाय नाहीत,डोळे नाहीत.ही सृष्टी फक्त एका आभासानुसार ते जगत