शोधकार्यात आलेल्या ५ तबकड्या मागे फिरल्यावर या बंडखोर चमूंनी अवकाशात उड्डाण केले आणि त्या पांढऱ्या ग्रहाच्या दिशेने ते उडाले. त्यांचे हे पहिलेच उड्डाण होते कारण या आधी त्यांनी केलेले उड्डाण हे वरिष्ठ शास्त्रज्ञांनी ठरवलेल्या नियमानुसार होते. या सगळ्या बंडखोर चमूसाठी हे सगळे नवीन होते. खरेतर त्यांच्यासाठी ही आत्महत्या करण्यासारखे होते कारण परतीचा मार्ग नव्हताच. पुढे जाऊन काही चांगले हाती लागले तरच आपल्याला पुन्हा स्वीकारले जाईल नाहीतर असाच अवकाशात मृत्यू हे सत्य त्यांनी स्वीकारले होते. कोणालाही कसलाही अनुभव नव्हता. समोर दिसणाऱ्या पांढऱ्या ग्रहाकडे ते आगेकूच करत होते. अजूनही ते मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत होते. अचानक एक जोरात हिसका बसला आणि त्याचा