देवी (कादंबरी) भाग 2

  • 114
  • 60

*******७*******************          ती रात्र...... ती रात्र आज सम्राटांना भयाण वाटत होती. आज रात्रीला त्यांना पुरेशी झोप येत नव्हती. देवीला भेटण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ते सारखे या कुशीवरुन त्या कुशीवर कड फिरवीत होते. अशातच सकाळ झाली व सकाळी सकाळी त्या राजवाड्याच्या भिंतीतून पक्षांचा किलबिलाट कानी आला. तसे ते उठले. उठल्याबरोबर त्यांनी हातपाय धुतले व राजवाड्याच्याच परसबागेत थोडा वेळ फिरण्यासाठी सज्ज झाले. त्यानंतर सकाळची न्याहारी आटोपून त्यांनी राज्यकारभाराची सुत्र कारुवाकीकडे सोपवली व ते देवीला भेटण्यासाठी राजवाड्यातून रवाना झाले.          तो रस्ता. आज तो रस्ताही दूर दूर वाटत होता. सम्राटांच्या मनात विचारांचं वादळ सुरु झालं होतं.