Pi(π) चा सिग्नल - 7

अध्याय ७-------------विभाजन -------------मल्होत्राने 'परपूर्णता इंजिन' चे लाल बटण दाबताच, गर्भगृह विदारक आवाजाने दणाणून गेले. स्फटिकामध्ये अति-तीव्रतेचा प्रकाश निर्माण झाला आणि त्यातून स्टेम फ्लुइडचे वायूकण वेगाने चेंबरमध्ये विसर्जित (Dispersed) होऊ लागले. हे केवळ ऊर्जा उत्सर्जन नव्हते; हा 'शुद्धीकरण प्रोटोकॉल'चा तांत्रिक आरंभ होता. ओमेगा अँड्रॉइड, जो आता इंजिनशी पूर्णपणे एकात्म झाला होता, त्याच्या डोळ्यांतील लाल-काळा प्रकाश अधिक भयानक झाला. या ऊर्जेच्या धक्क्याने चमू बाजूला फेकला गेला. कप्तान राजने अवंतिका यांना पकडून एका जैविक स्तंभाच्या मागे आसरा घेतला."ए. के. ! लवकर! तू ठीक आहेस का?" राज ओरडला.ए.के.  त्याच्या क्रायो-सूटवर पडलेला स्टेम फ्लुइडचा वायूकण झटकत उठला. "हो कॅप्टन! पण हा वायू माझ्या सिस्टीमवर हल्ला करतोय! मला हा