एक निरोप असाही... - 1

  • 600
  • 180

आपल्या एकुलत्या एक बहिणीच्या लग्नासाठी तो सुट्टी टाकून आला होता. बहिणीच्या साखरपुड्याला त्याला यायला जमले नव्हते म्हणून तो थोडा लवकरच म्हणजे फक्त ३ दिवस आधीच आला होता. कारणही तसेच होते कारण त्याच्या कर्तव्यासमोर सगळी नाती गौण होती. तसा हा कोल्हापूरला राहणारा पण बहिणीचे लग्न कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात होत. बहिणीला हळद लागत होती आणि सगळे बेफाम होऊन नाचत होते पण याचे लक्ष सतत टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्यांकडे लागून होते. आता बहिणीला हळद लावायची वेळ त्याची होती. सगळे त्याला हाका मारत होते पण याचे लक्ष बातम्यांमध्येच. शेवटी कोणीतरी येऊन त्याला बाहेर घेऊन गेले. आंब्यांच्या पानांनी हळद घेऊन तो त्याच्या बहिणीला हळद लाऊ