हॉलमधून बाहेर पडल्यावर तिघे त्या भल्यामोठ्या ट्रकमध्ये चढले. ट्रक सुटल्यावर इकडे हॉलमध्ये लग्नाच्या विधी पुन्हा सुरू झाल्या. अर्थात कोणाचं लक्ष नव्हतेच त्याकडे. इकडे ट्रकला जीव असता तर तो ही गहिवरून गेला असता इतके भावनिक वातावरण झाले होते. ट्रक आता मुंबई गोवा हायवेच्या दिशेने धाऊ लागला."सॉरी सर, भर लग्नातून तुम्हाला यावे लागले." ले.क. सुधीर."सॉरी काय त्यात, आपलं कर्तव्य आहे ते. देशासाठी लढायचं तर भावभावना, नातीगोती सगळं घरी ठेवून यावे लागते." गॉगल काढत तो बोलला."तरीही, असो. आता तुम्हाला रत्नागिरी एअरबेसवर सोडले की आमचे काम झाले.""म्हणजे""तिथून तुम्हाला पुढच्या सूचना मिळतील. अजून २ पायलट तिथे पोहचले असतील. तुम्ही तिसरे आहात.""बर नक्की काय झालंय?" त्याने