सुनी तशी जगन्मित्र होती. तिच्या खूप मैत्रिणी होत्या. ती त्यांची लीडर असल्यासारखीचं वावरायची. सगळ्या तिच्या मागे मागे. त्यावेळी मुलींना मित्र वैगरे असण्याचा प्रकार तसा अपवादात्मक असायचा. मी सुनीच्या आयुष्यातला अपवाद होतो. ती माझ्याशी तितकीच मोकळी असायची जितकी एखाद्या मैत्रिणीशी. त्याचं कारण म्हणजे मला असं वाटत होतं कि, मी तिचं सगळं ऐकायचो. स्वतःची बुद्धी स्वतःसाठी फार न वापरता. तीने सांगितलेलं करण्यात खर्ची घालायचो. शिवाय घराजवळ रहात असल्यामुळे अगदी बालवाडीपासूनच आम्ही एकत्र होतो. पण मोठे होत चाललो तरीही आमच्यातल्या लिंगभेदाने आमच्या मैत्रीत कधीही दुरावा आणला नाही. उलटं तो बंध एकमेकांच्या संगतीमुळे आणखी दृढ होत गेला.त्या वर्षी सातवीच्या परीक्षा संपून निकाल लागला. मला आठ्याहत्तर