वन राजकुमारी

  • 486
  • 141

हं.. हप्प..!!एका घावात शेवटची फांदी मोडली आणि चिनीने भारा बांधायला घेतला. सरपण आणायला रानात आलेल्या चिनीला आज उशीर झाला होता. एकतर ती आली उशिरा आणि दुसरं म्हणजे तिचं गर्भारपण.. शेवटचा महिना होता. तिचं बाळंतपण जवळ आलं होतं. त्यामुळं तिच्या हालचाली मंदावल्या होत्या बिरा तिचा नवरा सकाळीच त्यांच्या पाड्या पासून पंधरा किलोमीटर लांब एका गोदामात हमालीला गेला होता. सरपण आणण्यासाठी तिच्या सोबत येणारी कुशी आज आली नव्हती. चिनीला पर्याय नव्हता. तिनी भरभर भारा बांधला. पंधरा वीस किलोचे ते वजन तिनी थकल्या हातानी सवयी नुसार उचलले आणि डोक्यावर ठेवले."आज काय खरं नाय?" तिला मनातून जाणवलं. तहानेनी घसा कोरडा पडला होता. पायातली ताकत तिच