गणपतीनंतर शाळेत चाचणी परीक्षेचे वातावरण होते. त्यामुळे सचिन आणि त्याच्या ग्रुपने तशी शांतताच ठेवली होती. मी पण त्यांच्याशी अंतर ठेऊन होतो. सचिन सुनी आधीसारखेच थोडं थोडं बोलत होते. पण मला माहित होतं. हा सचिन नक्कीच काही ना काही करणार.चाचणी परीक्षा उरकल्या होत्या. यावेळी मी तीन विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पाडले होते. गुणांमध्ये सुनीच्या अगदी जवळ येऊन ठेपलो होतो. माझी अजिबात तिच्याशी शर्यत नव्हती. पण ती मला म्हणाली होती. तू खूप मोठा होशील. तीला जर तशी अपेक्षाच आहे तर मग, मी माझ्या क्षमतांचा विकास करायला हवा असं मला वाटू लागलं. मग कंटाळ्याची धूळ झटकत मी माझ्या सुस्त मेंदूला थोडीच चालना दिली