थंड झाल्यार खावचा भाग ३ त्याला भाताचा भला खासा ठाय आज्जी वाढून देई नी वर पावशेर भर विरजण ओती. तोण्डी लावायला पाच सहा तळलेल्या सांडग्या मिरच्या किंवा बचकाभर लोणचं घाली. बोंबड्या आमच्यासारखा सगळा भात एकदम कालवून न घेता एका बाजूने दही भात कोलसवून घास हातात झेलवून झेलवून त्याचा चेण्डू सारखा गोळा करून तो मोठा आ करून चोंदित असे. वाटेली विठू घाडी नी त्याची चेडवं सुद्धा असंच जेवीत . आम्हाला त्याचं अप्रूप वाटायचं . आज्जीच्या मागिलदारी डेगेखाली खूप