पुनर्जन्म

  • 789
  • 180

#पुनर्जन्म . काल झोपायला जाता जाता पुनर्जन्म या विषयावरची कुणाची तरी पोस्ट  मी वाचली.   रात्रभर छान शांत झोपलो होतो...पहाटे पहाटे एक सुंदर स्वप्न पडले..स्वप्नात चक्क सर्वशक्तिमान परमेश्वर मला दर्शन देण्यासाठी समोर आला! मी देवाला साष्टांग दंडवत घातले...   माझ्या भक्तीवर प्रसन्न होत देवाने आशीर्वाद दिले आणि म्हणाला..." वत्सा मी तुझ्यावर प्रचंड खुश आहे,आज मी तुला तुझ्या पुढच्या जन्मासाठी तू मागशील ते वरदान देणार आहे.सांग तुला पुढचा जन्म कसा हवा...." साक्षात परमेश्वराच्या रुपात माझ्यासाठी सुवर्णसंधी हात जोडून उभी होती. खरं तर या जन्मावर, या जगण्यावर माझे खूप प्रेम होते; पण त्याबरोबरच या आयुष्याबद्दल माझ्या काही तक्रारीही होत्या.जगताना या तक्रारी मनात ठेऊन मी आनंदी जीवनाचा