जोडे

  • 117

मिलिंद गाडीतून उतरले. त्यांनी हातात एक box असलेली पिशवी घेतली होती. पलीकडून स्वाती त्यांच्या पत्नी देखील उतरल्या. दिक्षा त्यांची धाकटी मुलगी कार पार्क करुन त्यांच्याकडे आली. मिलिंद आणि स्वातीताईंना आणखी एक मुलगी होती जी सिंगापूरला होती. लग्न केल्यावर आणि जॉबमुळे ती आणि तिचा नवरा तिकडेच स्थायिक झालेले. दिक्षाचं शिक्षण संपून ती नुकतीच नोकरीला लागली होती.समोर जे लग्न लागणार होते त्या कार्यालयाच्या समोर ते आले होते. दोघा नवरा बायकोच्या मनात प्रश्नचिन्ह होते. आत गेलो तर....? दिक्षा स्थिर होती कारण तीला इतकं भावनिक आंदोलन जाणवत नव्हतं. आई वडिलांसोबत यायचे एवढेच तिने पाळले होते. तिथे काय होणारं होतं याचा अंदाज तिलाही नव्हता.आलेल्या आमंत्रणाचा