#womensdayspecial मी १९८१ साली टेलिफोन खात्यात टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरीला लागलो.त्या आधी पुण्यात तरी या पदावर फक्त महिलांचीच भरती होत असायची. तो एका गावाहून दुसऱ्या गावासाठी मॅन्युअली ‘ट्रंक कॉल’ बुक करून संभाषण होण्यासाठी तासनतास वाट बघण्याचा काळ होता, आणि हे कॉल जोडून द्यायचं काम आमच्या खात्याच्या या महिला टेलिफोन ऑपरेटर तिन्ही शिफ्टमध्ये काम करून करायच्या. १९८० दरम्यान तांत्रिक बिघाडासंदर्भातील कामात महिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ऑपरेटर पदावर पुरुष कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आणि त्यातल्या पुण्यातल्या एका बॅचमध्ये माझी खात्यात वर्णी लागली. आमचे ट्रेनिंग चालू झाले. आमच्या तीस जणांच्या बॅच मधे एकूण चोवीस महिला होत्या. ट्रेनिंग संपले आणि पोस्टिंग झाल्यावर