"अहो!! जेवण झाल्यावर जरा टेरेसवर चला काही बोलायचंय!" आजकाल एवढं ऐकलं तरी काळजाचा ठोका चुकतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादातरी प्रसंग घडलेला असतो ज्यातल्या आपल्या सहभागाची "कर्म" आपल्या काळजाच्या ठोक्याची लय बिघडवून जातात. तर मग सादर आहे अशीच एक माझी कर्मकथा. ****"अरे दिवानो मुझे पेहचानो कहा से आया मै हू कौन? " असं गुणगुणत, थिरकत मी शनिवारी सकाळची शाळा सुटल्यावर घराकडे आलो. आम्ही चाळीत राहायचो. उद्या रविवार आल्यामुळे रात्री उशीरपर्यंत खेळायचा मनसूबा मनात रचून हुरळून जायला झालं होतं. दाराबाहेर चपला काढणार तेवढ्यात आमच्या शेजाराच्या बकुळा आजीकडे पोस्टमन आला."बकुळाबाई शिंदे!? तार घ्या." त्याने आवाज दिला. बकुळा आजी बाहेर आली आणि तिने तार