चमत्कार

  • 492
  • 147

“चमत्काराच्या शोधात हरवलेला समाज — भोंदू बाबांचा वाढता कहर”आज आपण प्रगतीच्या युगात जगतोय असं आपण अभिमानाने म्हणतो… मोबाईल, इंटरनेट, विज्ञान, शिक्षण — सगळं आपल्या हातात आलंय. पण या सगळ्या प्रगतीच्या आड एक भयानक वास्तव लपलेलं आहे — अंधश्रद्धेच्या नावाखाली चाललेली माणसांची लूट, आणि भोंदू बाबांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रभाव.प्रश्न असा आहे की, इतक्या शिक्षणानंतरही आपण अजून “चमत्कार” या शब्दावर का विश्वास ठेवतो?आज समाजात अनेक स्त्रिया — आणि काही पुरुषही — आपल्या आयुष्यातील समस्या, ताणतणाव, दुःख यामुळे इतके हतबल होतात की त्यांना वाटतं, “आता कुठेतरी काहीतरी चमत्कार होईल आणि सगळं ठीक होईल.” हीच ती सर्वात मोठी चूक ठरते. कारण चमत्कार हा