“आपली रिलेशनशिप – एक अनोखं नातं”या स्वार्थी जगामध्ये कधी कधी आपलं खरंच कोण असतं तर ते म्हणजे आपलं प्रेम.जिथे आपण सगळ्यात जास्त अपेक्षा ठेवतो… आणि सगळं मन मोकळं करून बोलतो.जिथे आपण एकदम बिंदास असतो, कारण मनात एक विश्वास असतो –माझं प्रेम माझ्या सोबत आहे.ती मला समजून घेते… काहीही झालं तरी “तू आहेस माझ्या सोबत” असं मनात एक समाधान असतं.खरं प्रेम म्हणजे फक्त आनंदाचे क्षण नाहीत,तर कधी आपण तिचा आधार असतो…आणि कधी ती आपला आधार बनते.अशाच एका अनोख्या आणि खऱ्या नात्याची ही कथा –“आपली रिलेशनशिप – एक अनोखं नातं”भाग १ – पहिली नजरपुण्याच्या एका गजबजलेल्या परिसरात संग्राम नावाचा मुलगा राहत होता.