अनुबंध बंधनाचे. - भाग 53

(2.1k)
  • 8k
  • 4.6k

अनुबंध बंधनाचे.....( भाग ५३ )आज प्रेमच्या लग्नासाठी सर्वच उत्सुक होते. चाळीतील प्रत्येक घरात असं वातावरण होतं की, जणु त्यांच्याच घरातील कोणाचं तरी लग्न आहे. सर्वांची लगबग सुरू होती. छोटी मुलं मुली नवीन कपडे वगैरे घालुन प्रेम दादाच्या लग्नासाठी सर्वात आधी तयार झाली होती. एरियामधून खुप लोकं येणार याची कल्पना होती त्यामुळे आरवने एक बस अरेंज केली होती. सकाळी आरवच्या घरी वरती सर्वजण आठ वाजेपर्यंत झोपले होते. त्याच्या आईने सर्वांना उठवले. आणि तयारी करण्यासाठी आपापल्या घरी पाठवले. त्याच्या घरी पण तयारी चालु होती. त्याच्या घरातील आई, ताई,भाऊ हे सर्वजण येणार होते.प्रेमच्या घरी खूुप लगबग सुरू होती. सर्वजण आवरून निघायची तयारी करत होते.