कोंदण पर्व एक - भाग 22

  • 6.3k
  • 5.3k

विदारक घरी आलो. फ्रेश होऊन सुनिकडे पळालो." काकू? सुनी? " घरात पाऊल ठेवतंच मी विचारलं." अरे ती तिच्या बाबांसोबत शहरात गेलीये. त्यांचं काही काम होतं. हिने हट्ट केला मी पण येते. मग नेलं त्यांनी. " काकू म्हणाल्या." किती वाजेपर्यंत येतील? " मी विचारलं." रात्र होईल यायला त्यांना. का रे? काही अर्जंट काम होतं का? " त्यांनी विचारलं." नाही!! असंच. " म्हणून मी सटकलो.सुनीने आजचा दिवसच टाळला होता. मला तर ती कधी एकदा भेटतीये असं झालं होतं. पण बहुतेक आज शक्य नव्हतं. खूप आठवण येत होती तिची. काल तिच्यावर ओरडलो त्याचा मला त्रास होत होता आता. मला जे करायचं होतं ते करुन