पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1

  • 6.2k
  • 1.1k

प्रिय सोना..आपली खाद्य यात्रा भाग 1तुझ्या खाण्याच्या आवडी पेक्षा त्यात दिसणारा तुझा चोखंदळ स्वभाव या विषयी बरेच लिहिता येईल तसे तर खाण्यात अमुक असावे तमुक नसावे अशी तुझी कधीच मागणी नसायचीसगळेच पदार्थ तुला आवडायचे घरी असो वा बाहेर ताटात कोणत्याही चवीचा पदार्थ असो तुझे ताट जेवणानंतर एकदम स्वच्छ असे जणू आरशा सारखा त्यात चेहरा बघून घ्यावा ताटात कधी काही टाकल्याचे मला आठवत नाही अन्न टाकायचे नाही हा नियमच होता तुझा माझ्याकडून मात्र तो काही वेळा मोडला जायचा तेव्हा संपत नसेल तर वाढून कशाला घेतेस आधी थोड घ्यावं मग आवडलं तर आणखीन उगाच हाव नको करू असे तू मला दटावायचाशक्यतो गोड पदार्थ तू टाळत असे मी मात्र थोडी गोडा कडे झुकणारी असले