स्वर आले जुळूनी - भाग 3

(181)
  • 2.2k
  • 1
  • 813

 स्वर आले जुळूनी भाग 3आता दिवसभर नुसती त्रेधा तिरपट व्हायची पण माझ्या पेटीच्या छंदात व्यत्यय आला नाही हाआनंद कष्टापेक्षाही मोठा वाटायचा मला. आपटे बुवा नामांकित गवई आणि वादक. गायनाच्या जोडीला पेटी, तबला, सारंगी वादनातही त्यांनी व्यासंग. अगदी नेमस्त मोजक्याच शिकवण्या त्यांनी घेतलेल्या.       बुवांचा संपर्क मोठा आणि संपन्न विश्वनाथ बागूल, रामदास कामत, प्रभाकर कारेकर, बकुल पंडित,वासुदेव चंद्रचुड, प्रसाद घांग्रेकर अशा दिग्गज मंडळींची बुवांकडे उठबस. मुंबई आकाशवाणी केंद्रावर बुवांचे शास्त्रीयसंगीताचे कार्यक्रम नियमीत व्हायचे. बुवांच्या मार्गदर्शनाखाली पेटी वादनात मला प्रभुत्व मिळणार याची खूण गाठ मी बांधली. रोज आठ ते साडे दहा अडीज तास शिकवणीचालायची. बुवा गळ्यानं सुरांची छाननी करायचे अन् ते स्वरमंडल मी