धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1

(180)
  • 4.7k
  • 1.7k

धुनी "अंधारलेल्या प्रकाशवाटा"(कांदबरी) - प्रकरण १ सावरखेडच्या वेशीवर तांबडं फुटलं होतं. राघू-मैनांच्या किलबिलाटानं शिवाराला जाग आली होती. पुण्यातून येणारी लालपरी (एसटी) खडखडचा आवज करत गडगडत वेशीपाशी थांबली आणि धुराचा लोट सोडून निघून गेली. तेव्हा त्या बस चा दरवाजा उघडून, धुरळ्यातून बाहेर पडला तो आशिष. हातातली बॅग सावरत त्यानं गावातल्या वेशीवरच्या मातीला स्पर्श करत, त्या मातीचा टिळा आपल्या कपाळी लावला आणि आपल्या गावच्या मातीत पाऊल ठेवल्या बरोबर एक खोल श्वास घेतला. "पाच वर्षं झाली... पण मातीचा हा वास पुण्यातल्या सेंटमध्ये कुठं सापडणार?" तो स्वतःशीच पुटपुटला.त्यानं लॅपटॉपची बॅग खांद्यावर नीट केली. गावात शिरताना त्याला जाणवलं की रस्ते सिमेंटचे झालेत खरे, पण गटारं तुंबलेलीच