स्वर आले जुळूनी भाग ४ त्याच्या पदरची कॉफी पिऊन अॅडमिशनफार्म घेतला. चार दिवसांनी नंदा आली. तिची कागदपत्र घेऊन मी पुजारीकडे दिली.त्याने १५ मिनीटात सगळे सोपस्कार पूर्ण करुन रसिट आणि आय कार्ड माझ्या हातातसुपुर्द केलं. बुवांनी विश्वासाने सोपवलेलं अवघड काम आपल्या हातून पूर्ण झाल्याच्याआनंदात त्या संध्याकाळी मी शिकवणीला गेलो. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी पेटी उघडून बुवांनी काल दिलेली चीज वाजवायलासुरुवात केली. पेटीचे सूर ऐकून बुबा बाहेर आले. मी फी रसीट, आयकार्ड बुवांकडे देत अॅडमिशन झाल्याच बोललो. बुवा आत गेले. मी रियाझ सुरुकेला. चार-पाच मिनीटात बुवा बाहेर आले. शिकवणीला सुरुवात झाली. साधारण अर्ध्या तासानेट्रे मध्ये चहाचे कप घेऊन सुनंदा बैठकीत आली. बुवांना