मी रस्त्याच्या कडेला थांबवून तलतचे मधुर आर्त स्वर कानात साठवीत राहीलो. त्यांच्या सुरातला कंप, थरथर आणि आर्तता हृदयाचा ठाव घेणारी.... गाण्याचा मुखडा ऐकून मी केलेला अंदाजही पुढची ओळ ऐकल्यावर साफ चुकलेला. ते गीत प्रेमांच साफल्य सुचीत करणारं नव्हतचं मुळी कारण पुढच्याच ओळीत कवी म्हणतो, "बदले में हमको गम दिया ssशुक्रिया ss" वैफल्यातही आनंद असतो.... मला नंदाची प्राप्ती नक्कीच होणार नाही पण तिच्या संगतीत सुरांचा साक्षात्कार होऊन माझ्या कौशल्यात पूर्णत्व येईल हे नक्कीच नाहीतर आयुष्यात समोर दिसणारी प्रत्येक चांगली वस्तू तुमच्या उपभोगासाठी विधात्यानं निर्मिली आहे असं थोडचं असणार आहे? नकळत तलतचा आणि त्या गीतकाराचा