आईचा त्याग

  • 1.8k
  • 690

आईचा त्याग अविस्मरणीय?             *नागपुरातील एक घटना. आईला मुलगा म्हणाला, 'मी तुला पोषतो. तू फुकटचं खाते.' तशी त्याची आई फुकट खात नव्हती. तिनं त्याला एक कॅफे टाकून दिला होता आपल्या वेतनाच्या पैशातून.  आता तिनं काही मिळकत आपल्या म्हातारपणाची शिदोरी म्हणून शिल्लक ठेवली होती. त्याही पैशावर डोळा होताच तिच्य लेकराचा. म्हणूनच ते शब्द.  ते ऐकून आई घायाळ झाली. तिला दुःख झालं व तिनं त्याला धडा शिकवायचं ठरवलं. तद्नंतर तिनं ज्या जागेत आपल्या मुलाला कॅफे टाकून दिला होता. ती जागा आताही तिच्याच मालकीची होती. ज्यातून तिनं त्याला नोटीस पाठवला व नोटीसमध्ये ती जागा खाली करायचा आदेश दिला.*