स्वर आले जुळूनी अंतीम भाग 6 जे.जे. मधून मला मास्टर्स डिप्लोमा मिळाला त्याच दरम्याने जे.जे. ची एक बँच गोव्यात पणजीला सुरु झाली. मी कान्व्होकेशन फॉर्म भरायला गेलो तेव्हा एच.ओ.डी.आंदुर्लेकर सरांनी मला बोलावून घेतलं. मी त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. मला बसायला सांगून कसलीही प्रस्तावना न करता सरांनी थेट मुद्याला हात घातला. “अशोक,जे.जे.ची ब्रँच गोव्याला सुरु झालीय् तुला कळलं असेलच. त्या माणसाना चांगला स्टाफ हवाय.... चांगला हँड देण्यासाठी त्यांनी मला गळ घातलीय्... तुझं गावतिकडे कोकणातचं आहे ना? इथे कंपनीच्या जॉबमध्ये तुझं स्केलआहे त्यापेक्षा जादा पेमेंट मिळेल, रहायला क्वार्टर मिळेल.पर्मनण्ट पेन्शनेबल जॉब आहे हा. ही संधी तू घेच. गोव्यात तुला संगीताचा छंदही