निर्मळ माया

  • 465
  • 159

"हणमंता कुठं निघाला? चल की जेवायला." जेवणाची सुट्टी झाली आणि आम्ही वर्गातून बाहेर आलो तसं मी माझ्या मित्राला हाक मारून बोलवायला लागलो. त्याच्या हातात डबा तर होता. पण तो शाळेच्या गेटकडे चालला होता. शाळा सुरु होऊन एकच आठवडा झाला होता. हनुमंत माझा मित्र पहिल्यापासून शाळेत माझ्यासोबतच जेवायचा. अष्टगंध लावलेला हनुमंता अभंग फार सुरेख गायचा. पाणीदार डोळ्याचा सडसडीत हनुमंता कधी कोणाशी भांडायचा नाही की कोणाच्या वाटेला जायचा नाही.आम्ही सातवीतून आठवीत आलो होतो. तो एक गाव सोडून पुढल्या गावातून शाळेत यायचा. त्याला रोज सहा किलोमीटर पायी चालावं लागत असे. गेले दोन तीन दिवस हा सुट्टी झाली की डबा घेऊन गेटच्या बाहेर का जातो?