बंधनत्यावर्षी पाऊस शाळा सुरु झाली तरी आला नव्हता. शाळा आता रेगुलर सुरु झाली. पहिला दिवस होता. मला जाडुने मधल्यासुटीत गाठली."सुने चल! गुलमोहराच्या पारावर डबा खाऊ आज." तो म्हणाला.मी गेले त्याच्यासोबत. कधीतरी लहर आल्यागतच वागतो हा. मी इकडे तिकडे बघितलं. "श्वेता नाहीये. रेणुसोबत बसलीये आज. असू दे.. सुने! ऐक, मी काय म्हणतोय. दहावीच वर्ष आहे आणि यावर्षी मला अजिबात हयगय नको आहे हा तुझ्याकडून!! तुझं ते समाजसेवेच व्रत पुढल्यावर्षी परत सुरु कर. पण तू तुझं काम करताना आणि इतरांसाठी वेळ न घालवतानाच मला दिसायला हवी. मी खूप भांडेन तुझ्याशी तू आता इकडे तिकडे involve होताना दिसलीस तर." जाडू बोलला."बापरे. इथं धमकवायला घेऊन