कॉलेजमध्ये असताना प्रत्येकाचा एक स्वघोषित 'सल्लागार' मित्र असतो. माझा असाच एक मित्र होता— 'बबड्या'. त्याचं स्वतःचं अफेअर कधी टिकलं नाही, पण पूर्ण कॉलेजला प्रेमाचे धडे तोच द्यायचा. एकदा बबड्याने मला गळ घातली, "आदि, बघ... जर तुला रियाला पटवायचं असेल, तर तुला काहीतरी 'डिफरंट' करावं लागेल. कॅफे, मूव्ही जुनं झालंय रे, तिला एखाद्या धार्मिक ठिकाणी ने!". आणि मी, मूर्ख शिरोमणी, त्याच्या सल्ल्याला बळी पडलो. मी रियाला विचारलं, "रिया, उद्या विनायकी चतुर्थी आहे, आपण मंदिरात जाऊया का?"तिने आश्चर्याने पाहिलं, "बापरे! तू इतका धार्मिक आहेस? नक्की जाऊया!"