कोंदण पर्व एक - भाग 38

  • 630
  • 162

संभ्रम मी रविवारी सकाळी नऊला घरातून प्रज्ञाकडे निघाले होते. तिच्या बहिणीचा साखरपुडा होणार होता चारपाच दिवसांनी. तर प्रज्ञाला घागरा निवडायला मदत करण्यासाठी तिच्या घरच्यांसोबत ती मला चल म्हणाली होती. जाडूपासून हा प्लॅन मी लपवला होता. पण याला कुठला डिटेक्टिव्ह चावला होता देव जाने. निम्म्या रस्त्यात पण आले नव्हते तर जाडुने सायकल आडवी घातली. मी केवढ्याने दचकले. "सुने ss!! अजिबात नाही जायचंय कुठे!! सरळ घरी चल." जाडू मला ओरडत होता."असं काय करतो रे जाडू? जाऊ दे कि.. " मी त्याला विनवत होते." ती प्रज्ञा बघेल तिचं. तीला काय कोंणी नाहीये का घरात? घागऱ्याचे सॅम्पल बघायला तू कशाला हवीस? अजिबात नाही जायचं. घरी चल quadratic equation