श्रद्धांजली

  • 123

“त्या चार वर्षांच्या चिमुकलीसाठी…”आज शब्दही थरथरतात… कारण ही फक्त एक बातमी नाही, ही एका निष्पाप जीवाची निःशब्द किंकाळी आहे. चार वर्षांची ती मुलगी… जिने अजून आयुष्याच्या पानांवर पहिलं अक्षरही लिहिलं नव्हतं, जिने आईच्या कुशीतच जग शोधायचं होतं, जिने बाहुल्यांशी खेळत हसावं, धावत-धावत पडावं आणि पुन्हा उठावं… तिचं ते निरागस जग एका क्षणात उद्ध्वस्त झालं.कोण जवाबदार आहॆ. तिला मनसोक्त खेळायचं होतं हिंडायचं होतं एखादा फुलपाखराप्रमाणे तिला उडायचं होतं. हा लहानशा जिवाचे काय स्वप्न असतील. तिच्यासोबत ही कृत्य होत असताना.त्या क्षणी तिच्या डोळ्यांत काय आलं असेल? भीती… गोंधळ… असहाय्यता… कदाचित ती रडत असेल, आईला हाक मारत असेल… “आई…” हा शब्द तिच्या ओठांवर