जया देव तारी - भाग ०२ म्हाजनाचे लग्न उंच वयात झाले. त्याला हारोहार अकरा मुलीच झाल्या. अकरावी मुलग़ी झाली त्या बाळंतपणानंतर म्हाजनाची बायको अंथरूणाला खिळली. साताठ महिन्यांच्या भरीला तिने गुट् केले. त्यावेळी म्हाजन साठीच्या जवळ पोचलेला होता. त्यावेळी कानडी मुलखातले काही ब्राह्मण आतून पैसे घेवून कोकणात कुठेही, बिजवर, तिजवर, भुके कंगाल , व्यंगी कोणालाही मुलगी देत. अशी कामे करणारे काही मध्यस्त असायचे. पावसाळी चिव्याच्या काठ्या तोडून कोल्हापूर मिरजेकडे व्यापाऱ्याला घालणाऱ्या लखू देवधराची नी म्हाजनाची बरेच वर्षांची दोस्ती होती. मुली पुरवणारा अथणीचा शंभू देसाई नावाचा मध्यस्त लखूच्या ओळखीचा होता. म्हाजनाशी सल्लामसलत करून लखूने देसायाला गळ घातली. त्या स्वस्ताईच्या