अनुबंध बंधनाचे. - भाग 55

(678)
  • 3.9k
  • 2.1k

अनुबंध बंधनाचे.....( भाग ५५ )प्रेम घरी आल्यावर वैष्णवी त्याला साडीबद्दल विचारते. त्यावर तो तिला बोलतो की, त्याच्याकडे सेम पॅटर्न मधे साडी नव्हती म्हणुन नाही आणली.त्या रात्री तो जरा अस्वस्थ होता. मेघाचे अशा प्रकारे त्याला बोलणे, त्याच्यासाठी खुप त्रासदायक होते. पण जर तिच्या बाजूने विचार केला तर ती कुठे चुकीची होती. तिच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी असाच विचार केला असता. मग तिला का दोष द्यायचा. तिचा खुप जीव आहे अंजलीवर. त्यामुळे तिचे असे रिॲक्ट होणे साहजिकच होते. पण कुठेतरी तिच्या बोलण्यात काही गोष्टी विचार करायला लावणाऱ्या होत्या. कारण... अंजली जरी हे सर्व मान्य करत आहे असे दाखवत असली तरी, तिच्या मनात