प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1

  • 300
  • 93

अचानक उद्भवलेल्या आणि यापूर्वी कोणतीच लक्षणे नसलेल्या आजारातून तू बरा होशील म्हणून तुला पुण्यात नेले अगदी शेवट पर्यंत चांगला बोलणारा तू अचानक रात्रीतून ब्रेन स्ट्रोक होऊन गेलास  आणि माझ्यावर जणू वीज कोसळली ध्यानी मनी नसताना तुझे जाणे स्वीकारणे मला कठीण झाले माझ तर सगळ आयुष्य उलटे पालटे झाले अनपेक्षित रित्या कोणीतरी उंचावरून जोरात ढकलून दिल्या सारखे झाले रे आत्तापर्यंत वडिलांच्या आणि तुझ्या राज्यात एखाद्या राजकन्येसारखी वाढलेली मी पूर्ण हादरून गेले तुझ्या अवती भवती माझे सगळे आयुष्य फिरत होते रे आपण दोघेही गेली बेचाळीस वर्ष एकमेकात इतके गुंतलो होतो की आपल्याला एकमेका शिवाय आयुष्य नव्हते  आपणच एकमेकांचे जग होतो Made for each other पासून सुरू झालेला आपला प्रवास... आतापर्यंत mad for