सानिका - 3

  • 237
  • 96

भाग ३ आपण बघितलं :- सानिका चा रिझल्ट लागल्यावर ती आदल्या दिवशी घरच्यांसोबत फिरायला जाते . दूसऱ्या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणींना भेटते . आता पुढे :- सगळ्या मित्रांनी मिळून नुसतं भटकायला जायचं असं ठरवलं . कुठेही एक ठिकाणी जाण्याऐवजी वेगवेगळ्या जागी जायचं . जिथे भूक लागली तिथे जे वाटेल ते खायचं आणि मस्त हिंडायचं .‌ तिन्ही मुलांकडे बाईक्स होत्या  . चिन्मय ने रूची ला , कौशल ने कविता ला आणि अनिरुद्ध ने सानिका ला आपल्या सोबत बसवलं आणि ते निघाले भटकायला . फिरता फिरता भूक लागली म्हणून एकेठिकाणी  एका रेस्टॉरंट मधे गेले . सगळ्यांनी त्यांच्या आवडीच्या पदार्थांची ऑर्डर दिली आणि गप्पा मारत