गझलनवाज भीमराव पांचाळे

  • 2.8k
  • 1k

माणुसकीचा समृद्ध गझलस्वर : भीमराव पांचाळे लेखन : अविनाश भिमराव ढळे (एक अश्वस्थामा)    अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले आष्टगाव नावाचे एक छोटेसे गाव आहे. तिथे भीमराव पांचाळे यांचा जन्म झाला. आईने गायलेली जात्यावरची गाणी, वडील म्हणत असलेली भजने आणि त्या भागातली पहाडी रागातील लोकगीते कळत नकळत भीमरावांच्या मनात संगीताविषयीचे प्रेम रुजवत गेली. त्या वेळच्या एकूणच प्रतिकूलतेत हे स्वरच भीमरावांना जगण्याचे बळ प्रदान करीत गेले. पुढे अमरावतीला शिकत असताना राजकमल चौकात अगदी रिक्षावाल्यांना गझल ऐकवत असलेले सुरेश भट त्यांना भेटले आणि भीमराव गझलेच्या प्रेमात पडले. 'आपण गझलेच्या वाटेने गेलो नाही, तर गझलेनेच आपल्या जीवनाची दिशा ठरवून दिली', असे भीमराव