भाग एक आज सकाळपासून घरात एकच गडबड चालली होती . आई , मोठी काकू आणि छोटी काकू तीघी मिळून स्वयंपाक घरात राबत होत्या . ती आपलं सगळं आवरून बाहेर आली तर घराचा नकाशा च बदललेला होता . तिने आई ला विचारलं..... " आई !! नाश्ता देते का , मला लैब ला जायला उशीर होतोय . " आई ने स्वयंपाक घरातून बाहेर येऊन म्हटलं ..." सरू !!! मी काय म्हणते , आज लैब ला नाही गेली तर चालणार नाही का . " " का गं , काही काम होतं का ... " सरू म्हणजे सरीता ने विचारलं . तसं घरच्यांची तयारी बघून तिच्या लक्षात आलं