जया देव तारी - भाग 3

  • 153
  • 1
  • 60

जया देव तारी - भाग ०३म्हणून दत्तंभट  खोतांकडे जायला निघाला. तो गेला लगेचच  बापू दात्ये  रोजच्या रिवाजाप्रमाणे आले. ते आले तेंव्हा  दत्तू गुरव बळाणीवरच  बसलेला होता. दात्यानी गाभाऱ्याला कुलूप बघितल्यावर गुरवाला विचारले तेव्हा  त्याने  मिराशांची काय ताकिद आहे त्याची  उजळणी केली. त्यावर काहीही न बोलता बापूनी   गाभाऱ्या बाहेर कोनाड्यातला गणपती नी समोरचा नंदी  यांची पुजा केली. गाभाऱ्याच्या चौकटीच्या  उंबऱ्यावर पाणी ओतून  ईश्वरासाठी  बिल्वदल नी  फुलं  ठेवली. मग आवाठातल्या लक्ष्मीकेशव, काळभैरव , मुळवसाची पूजा करून ते निघून गेले.  मात्र त्या दिवासानंतर त्यानी  ईश्वराची  नित्यपूजा कायमची  बंद केली. श्रावणात नेमधर्माच्या निमित्ताने  कोणकोण गावकरी  देवदर्शनाला येत. तेही  ईश्वराच्या गाभाऱ्याला कुलूप बघून अजाब करीत.