जया देव तारी - भाग ०६ खोतांच्या महापुरुषा जवळ अवास्तुक उंबराचे रोप उगवले. ते चांगले हातभर उंच झाल्यावर एक दिवस शंभूच्या नजरेला पडले. तो दिवसभर त्यावर विचार करीत होता. रात्री अकस्मात त्याला युक्ती सुचली. महिनाभराने योजने प्रमाणे सगळी जम झाली. मग शुक्रवारी सकाळी गडी कामाला आले त्याना हाकारीत शंभू म्हणाला, “आज पहाटे मला स्वप्नात दृष्टान्त झाला. आगरात महापुरुषाच्या बाजूला उंबराचे झाड आहे त्याच्या डाव्या अंगाला गाणगापुरच्या पादुका आहेत. मी गेली पन्नास वर्षं इथे पडून आहे....... तू मला वर काढ आणि माझी प्रतिष्ठापना कर असा साक्षात दत्तगुरूनी मला आदेश दिलेला आहे. ” गडी माणसं भारावून म्हणाली,