“स्वतःलाही जपा…” ️सकाळची ती घाईघाईची वेळ असते... मुलांचे डबे, नवऱ्याचा नाश्ता, आणि सकाळची सगळी कामे आटोपून जरा कुठे चहाचा कप हातात येतो. घराची सगळी धावपळ थांबलेली असते आणि आपण सुटकेचा श्वास टाकत विरंगुळा म्हणून सोफ्यावर बसून हातात मोबाईल घेतो. फेसबुक उघडलं की, 'आजची रेसिपी' म्हणून एक व्हिडिओ अगदी न चुकता समोर येतो. मनात कसं असतं, 'उद्या सकाळी नाश्त्याला काय करायचं?' ही काळजी गृहिणीला चोवीस तास लागलेलीच असते, त्यामुळे आपणही जशी एखादी आवडीची सिरीयल बघावी, तसा तो व्हिडिओ अगदी मन लावून बघायला लागतो. तेवढेच कोणत्या नवीन आयडिया मिळतील.आणि आपल्याला कधी कधी स्वतःला कामाचा कमालीचा कंटाळा आलेला असतो, पण तिचा तो व्हिडिओ