पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग १

  • 1.7k
  • 588

प्रिय सोनातुझा विनोदाचा सेन्स जबरदस्त होता काही काही वाक्य अशी बोलायचा की त्यात तुझी अशी खास लकब होतीजी माझ्याकडून कधीच विसरली जाणार नाहीतकधी कधी मी घरात घालायच्या चपला वरच्या मजल्यावर विसरून खाली यायचे तू वरून खाली येताना मुद्दाम मिश्किल हसून मला विचारायचा.."महाराज आपल्या पादुका राहिल्यात आणून देऊ का "मे म्हणायचे अरे नको आणते माझ्या मी.उन्हाळा तुला थोडा कडक वाटायचातब्येतीला सोसायचा नाहीमग तुझं नेहेमीच वाक्य.."हे उन नुसत घाम काढतय..Humidity लय वाढलीय"एखादी गोष्ट मला काही वेळा पटायची नाही किंवा समजायची नाहीअशा वेळी खोट्या रागाने तू मला म्हणायचा"लते तू मंद आहेस का"?हे वाक्य खरे म्हणजे तेव्हा एका गाजलेल्या मराठी सीरियल मधे होते आपल्या