जया देव तारी - भाग ०७त्याकाळी इमारत बांधण्यापूर्वी एक पाऊस काळ गेल्यावर पाया पक्का होतो असं मानीत असत. म्हणून पायाच काम झाल्यावर एक पावसाळा भर तरी ते तसंच राहू देत असत. त्याप्रमाणे गीमात अखेरीला देवळाच्या पायाचं काम पुरं करून पुढचं काम दसरा झाल्यावर करायचा बेत नक्की झालेला होता. देवळाच्या इमारती साठी बारं, सऱ्या, वासे, खांब यांना लागणारं लाकूड - सागवान , किंदळ, आईन आणि फणस ही झाडं भादव्यात तोडून घेतली. खांबांसाठी सड्यावरचे मोठ मोठे खैर आडवे करण्यात आले. दसरा झाल्यावर तिर्लोट आणि सौंदाळ्यातून चिरकाम्यांच्या आठ जोड्या बोलावल्या. बांधकाम गावातला बाबल्या सुतार करणार होता. त्याने मापं दिली त्याप्रमाने चिरकामी नग पाडायला