एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 1

  • 2.3k
  • 795

कॉलेजची धावपळ आणि शहरातल्या गजबजाटातून सुटका म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जाणं, हा माझ्यासाठी नेहमीच आनंदाचा भाग असायचा. गावाची ती शांतता, मातीचा वास आणि मामाच्या वाड्यातलं ते मोकळं वातावरण मनाला उभारी द्यायचं.त्या दिवशी सकाळची वेळ होती. हवेत अजूनही थोडा गारवा होता. आजी ओट्यावर बसून काहीतरी निवडत होती. मला बघून ती म्हणाली, "आरं, एवढं काय बसलायस रिकामा? जा की पळत, त्या रामाच्या गड्याला बोलावून आण. सांग म्हणावं, शेतातलं काम बघायचंय आज."मी आजीचं ऐकलं आणि लगबगीने रामा मामाच्या घराच्या