रानभूल - भाग 5

  • 588
  • 180

रानभूल ५ रानकुत्र्यांचा एक कळप रात्रीच्या शिकारीसाठी बाहेर पडला होता.अत्याधिक क्रूर असलेला हा रानटी पशू!एकदा शिकार टप्प्यात आल्यावर त्यांचे लचके तोडल्या शिवाय सोडत नाही.अमानुष पध्दतीने ते शिकार करतात.वाघ सुध्दा ह्या कुत्र्यांच्या कळपां पासून दूर राहणे पसंत करतात. ह्या कुत्र्यांच्या प्रमुखाला मानवी रक्ताचा वास आला.त्याने इतरांना सूचित केले.नेमक्या दिशेचा अंदाज घेत त्याने कळपाला पळण्याचा हुकूम दिला.बघता बघता ते सुसाट धावू लागले खडपांवरून...झुडपांतून.धडाधडउड्या मारत भुकेलेले पशू धावत होते.मानवी मांस खायला मिळणार या कल्पनेनेउत्तेजीत होत ते पळत होते. त्यांच्या तोंडातून लाळ गळत होती.विचित्र आवाज करत ते एकमेकांशी संपर्क करत होते. यांची गंध ओळखण्याची व त्याचा माग काढण्याची क्षमता अफाट असते.बघता बघता ते सगळे