जया देव तारी - भाग ०८ मूर्ती घेवून तिघेही अथणीला आले. तिथे मुक्काम करून कोल्हापूर राधानगरी वरून हळयात पोचले. दत्तजयंती पूर्वी आठवडाभर गजाबारात दत्तमुर्तीची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम योजला होता. धार्मिक विधीला मुलगा नी सून बसणार होते. विधी सुरू झाला नी ‘हूं हूं ’ करीत मुठी वळून गाभाऱ्या भोवती प्रदक्षिणा मारताना मोठ्या चलाखीने कनटीला खोचलेली भस्माची पुडी मुठीत खोलून कागदाचा बोळा खाली टाकून देवासमोर आल्यावर शंभू वदायला लागला. लटा लटा आंग हालवीत दाण् दाण् पावले आपटीत औदुंबराच्या झाडा समोर जावून घुमायला लागला. माहितगार जाणते पुढे झाले नी शंभूच्या पाया पडून त्यानी विचारणा केली. “ तू कोण आहेस? इथे