तिजोरी - प्रकरण 1

तिजोरी प्रकरण १ नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मधील घड्याळ रात्रीचे अकराला पाच कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच होता. तेवढ्यात फोन वाजला. पाच मिनिटे उशिरा जर फोन आला असता तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो ऑफिस मधून निघून गेला असता.. पण आज त्याचं भाग्य तेवढं नव्हतं त्याने फोन उचलला. रात्रीच्या वेळेला त्याच्या ऑफिसची अशी पद्धत होती की फोन उचलला की लगेच त्याचं रेकॉर्डिंग सुरू होत असे. मनात ती जाणीव ठेवूनच त्याने फोन उचलला. “अभेद्य सेफ कॉर्पोरेशन” तो यांत्रिकपणे म्हणाला. “मी हितेंद्र कपूर” फोन मधून एक उद्धट वाटणारा आवाज आला. रोज अनेकांचे फोन घेऊन वज्रला आवाजावरून त्यांचं व्यक्तिमत्व कसं असेल याचा बरोबर अंदाज