माझं भविष्य वेटिंग वर आहे

  • 540
  • 168

तारीख पे तारीख आणि माझं भविष्य वेटिंगवरमी धनु राशीची आहे आणि काही दिवसांपूर्वी माझ्याकडून उत्सुकतेपोटी एक मोठी चूक झाली. दुपारी घरातली सगळी कामं आटोपली होती, चहाचा कप हातात होता आणि वेळ घालवण्यासाठी मी मोबाईलवर सहज धनु राशीचं एक पॉडकास्ट पाहायला गेले. बस तो एक व्हिडिओ काय पाहिला माझ्या मोबाईलच्या अल्गोरिदमची जणू मतीच गुंग झाली. त्या अल्गोरिदमला बहुतेक वाटलं असावं की ही बाई आता स्वतःच्या अक्कल हुशारीवर किंवा कष्टावर नाही तर थेट ब्रह्मांडातल्या ग्रह ताऱ्यांच्या आणि ज्योतिषांच्या भरवशावरच जगणार आहे.तेव्हापासून माझ्या मोबाईलचं डोकं असं काही फिरलंय की विचारूच नका. सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलमध्ये नुसता राशींचा सुकाळ झालाय. मोबाईल लॉक