भाग ४खोलीतील एकटेपणा अनघाला आता टोचू लागला होता. काहीवेळ ओक्साबोक्सा रडल्यावर, तिने डोळ्यांत साचलेले अश्रू पुसले आणि ती ताडकन उठून बाथरूममध्ये गेली. आरशात स्वतःच्या प्रतिबिंबेकडे पाहताना तिला स्वतःचीच ओळख पटत नव्हती. चेहऱ्यावरचा मेकअप विस्कटला होता, डोळे सुजले होते. तिने गार पाण्याचे हबके तोंडावर मारले. आरशातल्या त्या थकलेल्या प्रतिमेकडे बघून ती पुटपुटली,"असं नाही होऊ शकत .....हे ...हे कसं होऊ शकत... नाही ... नाही हे ...हे खरं नाहिये ... "तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. तिने आपला फोन शोधला आणि कातर झालेल्या स्वरात अमोलचा नंबर डायल केला. फोनची रिंग वाजत होती, पण पलीकडून कोणीही उचलत नव्हतं. 'ट्रिंग... ट्रिंग...' असा तो आवाज अनघाच्या काळजाचा