जया देव तारी - भाग ०९ कबूल केल्याप्रमाणे दुपारी देसायांची वामकुक्षी होण्याआधी नारायण गडी घेवून हजर झाला. मोडलेल्या नक्षीच्या तुकड्यात लोखंडी चोरे मारून मुळबरहुकूम जोडकाम केले. सांध्यांमध्ये चंद्रूस भरून फटी बुजवल्या. दोन स्वस्तिके नव्याने बनवून ती जोडून मोडलेली बाजू पूर्ववत केली. दांड्याचा पेचलेला भाग कापून नवीन तुकडा भरून दांडा उजू केला. एकफुली नवीन भरली. मोडक्या शिपाया ऐवजी सागवानी लाकडाचा नवीन शिपाई बनवला. त्याचा माथा नी कडा यावर जुन्या नगाबर हुकूम नक्षी कोरली. मग कडू तेलाच्या दिव्याची काजळी धरून ती पॉलीशात खलून नवीन जोडकामाची मूळ रंगा शी छटा जुळवून सगळ्या पालखीलाच पॉलिशचा हात मारला. सगळं काम एवढं बेमालूम झालेलं होतं की, पहाणाराला