अनुबंध बंधनाचे.....( भाग ५६ )पुढे काही दिवस असेच निघुन जातात. प्रेमच्या घरी आनंदाची बातमी समजते. काही महिन्यातच त्याच्या घरी लहान बाळाची हालचाल होणार होती. त्यामुळे घरचे वातावरण अगदी आनंदी झाले होते.काही दिवस आधीच वैष्णवी तिच्या माहेरी गेली होती. त्यादरम्यान एक दिवस प्रेम अंजलीला भेटायचे ठरवतो. तिला मॅसेज करून तो भेटायचे ठिकाण आणि वेळ सांगतो. तो मॅसेज पाहून अंजली तर खुश होते. ठरलेल्या दिवशी ते दोघे भेटतात. नेहमीप्रमाणे अंजली वेळेआधीच येऊन त्याची वाट पहात होती. प्रेम तिथे पोचतो. ते दोघे एका ठिकाणी बोलत बसतात. अंजली : प्रेम...! काय झालं...! असं अचानक भेटायला बोलावलं...! सगळं ठिक आहे ना...?प्रेम : हो...! ठिक आहे.अंजली : बरं मग...! तु